सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्रीच्या त्रासाला कंटाळून नर्स बेपत्ता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्रीच्या त्रासाला कंटाळून नर्स बेपत्ता

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या शिव येथील सायन रुग्णालयात उप अधिष्ठात्रीच्या छळाला कंटाळून ड्युटीवर असलेल्या मीनाक्षी शहा - गायकवाड या परिचारिका बेपत्ता झाल्या आहेत. ड्युटी वर असलेली परिचारिका बेपत्ता झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

शिव रुग्णालयात परिचारिका म्हणून मीनाक्षी शहा - गायकवाड व त्यांचे पती मिलिंद गायकवाड यांच्यावर उपअधिष्ठात्री निर्मला बारसे यांनी जाणीवपूर्वक बदला घेण्यासाठी घाणेरडे आरोप केले आहेत. उपअधिष्ठात्री बारसे यांनी केलेले आरोप सहन न झाल्याने मीनाक्षी गायकवाड १४ मे पासून रुग्णालयातून गणवेशात गायब झाल्या आहेत. गायकवाड यांनी गायब होण्यापूर्वी आपल्या पत्रात काही बरे वाईट झाल्यास उपअधिष्ठात्री निर्मला बारसे यांना जबाबदार धरावे असे नमूद केले आहे. मीनाक्षी गायकवाड गायब झाल्याची तक्रार माटुंगा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने रुग्णालयात आंदोलन केले आहे. या आंदोलनानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेल्या पत्रात या प्रकरणाची कसून चौकशी करावी, चौकशी पूर्ण होई पर्यंत बारसे यांच्याकडून नर्सिंगचा पदभार काढून घ्यावा अशी मागणी केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages