लहान मुलांना ए.सी. बसमध्ये अर्धे तिकीट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लहान मुलांना ए.सी. बसमध्ये अर्धे तिकीट

Share This
मुंबई- बेस्टच्या वातानुकूलित बसमधून १३ वर्षाखालील मुलांचे तिकीट हे निम्मे असावे, असा नियम आहे. तरी प्रत्यक्षात बेस्टच्या वातानुकूलित बसमधून प्रवास करणा-या या बच्चेमंडळींकडून प्रौढांप्रमाणेच पूर्ण तिकीट कापले जायचे. त्याचा मोठा फटका वातानुकूलित बसला बसला आहे.  त्यामुळे आता ही चूक बेस्टने सुधारली असून मुलांना अर्धे तिकीटच आकारण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

बेस्टने १९९८ पासून वातानुकूलित बसगाडया सुरू केल्या. रस्त्यांवरील खासगी वाहनांचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी बेस्टने वातानुकूलित बससेवा एकूण २३ बस मार्गावर सुरू केली; परंतु ही सर्व सेवा तोटयात असून खासगी वाहनांप्रमाणे बेस्टच्या गाडया प्रवाशांच्या निवासस्थानांपासून कार्यालयापर्यंत थेट परिवहन सेवा देऊ शकत नसल्यामुळे तिला प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे बससेवेवरील प्रवाशांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी कर्मचारी व अधिका-यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये वातानुकूलित बस मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मुलांना सवलतीच्या प्रवासभाडयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे १३ वर्षाखालील मुलांना सवलतीचे प्रवासभाडे आकारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. ही सवलत दिल्यास वातानुकूलित बसमधील प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल. त्याबाबत प्रस्ताव बेस्ट उपक्रमाने मंजुरीकरता बेस्ट समितीपुढे मंजुरीसाठी मांडला आहे.

सध्या एकूण २३ मार्गावर सुरू असलेल्या वातानुकूलित बससेवेत दैनिक, मासिक आणि त्रमासिक बसपास उपलब्ध आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचे सवलतीचे प्रवासभाडे या बससेवांना देण्यात येत नाही. त्यामुळेच वातानुकूलित बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांकडून तिकीट भाडे पूर्ण आकारले जाते. परिणामी एकत्रित कुटुंबाने मुलांसह प्रवास करणारे प्रवासी या बस सेवांचा लाभ घेण्यास उत्सुक नसतात,असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
chart

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages