उद्याने आणि खेळाची मैदानामध्ये शौचालयाची सुविधा दया - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उद्याने आणि खेळाची मैदानामध्ये शौचालयाची सुविधा दया

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - र-वच्छ मुंबई अभियानांतर्गत मुंबई मधील उद्याने आणि खेळाची मैदाने  यामध्ये त्वरित शौचालयाची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे केली आहे. मुंबई शहरामधील अनेक उधानांमध्ये वरिष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी व खेळाच्या मैदानांमध्ये लहान मुले खेळण्यासाठी येत असतात काही वरिष्ठ नागरिक मधुमेह  व इतर अजाराने त्रर-त असतात या उधान आणि खेळाच्या मैदानांमध्ये किंवा आजुबाजुच्या परिसरामध्ये शौचालयाची सुसुविधा उपलब्ध नसल्याने नैसर्गिक विधीकरिता त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते त्यामुळे र-वच्छ मुंबई अभियानांतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबई मधील उधाने आणि खेळाची मैदाने यामध्ये शौचालयाची सुविधा पुरविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे केली आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages