मुंबई / प्रतिनिधी - पावसाळ्यात नालेसफाईअभावी रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गुरुवारी रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड रेल्वे स्थानक यादरम्यान रेल्वेच्या टॉवर वॅगनमधून प्रवास करुन मध्य रेल्वेच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.
सदर पाहणीदरम्यान महापालिका आयुक्तांनी मस्जिद बंदर येथील वालपखाडी नाला, सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यानचे नाले तसेच, शीव स्टेशन जवळील मुख्याध्यापक नाला, कुर्ला स्टेशन जवळी अतिशय महत्त्वाचा आणि नुकताच लोह मार्गाच्या खाली मायक्रो टनलींग तत्रज्ञानाने रुंद केलेला कारशेड नाला, कांजुरमार्ग येथील कर्वेनगर नाला, मुलुंड येथील नाणेपाडी नाला यांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान लोहमार्गाला लागून असलेल्या झोपडपट्टयांतून मोठया प्रमाणात कचरा येत असल्याचे निर्दशनास आले. यावर कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी मेहता आणि ओझा यांनी पुढील आठवडयात संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. महापालिका आयुक्त आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी पावसाळयादरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सतत समन्वय ठेवण्यासंबंधी रुपरेषा निश्चित केली.
Post Top Ad
05 June 2015
Home
Unlabelled
पालिका आयुक्त व रेल्वे अधिकारी यांचा नालेसफाई पाहणी दौरा
पालिका आयुक्त व रेल्वे अधिकारी यांचा नालेसफाई पाहणी दौरा
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

