मुंबई (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी कोचमधील अस्वच्छतेच्या तक्रारींची नोंद घेणारी ‘क्लीनमायकोच डॉटकॉम’ ही वेबसाइट तयार केली होती, परंतु इंटरनेटचे कनेक्शन ट्रेनच्या प्रवासात मध्येच गायब होत असल्याची तक्रार आल्यानंतर केवळ ‘पीएनआर’ नंबर ५८८८८ या हेल्पलाइनवर ‘एसएमएस’ केल्यावर कोचमध्ये पंधरा मिनिटांत सफाई कामगारांना धाडणारी नवी योजना सुरू झाली. परंतु धावत्या मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेतली आहे की नाही याचा पडताळा घेणे कठीण झाले होते. आता मध्य रेल्वे कोचमध्ये आधुनिक असे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन डीव्हाईस तंत्रज्ञान वापरणार आहे. सफाई कामगाराच्या हातात हॅण्डसेट देण्यात येणार असून त्याने सफाई करण्यापूर्वी आणि केल्यानंतर रेडिओ टॅगला स्वाइप करण्याचे बंधन आहे. त्याच्या नोंदीनंतरच संबंधित कंत्राटदाराला पैसे मिळणार आहेत. सुरुवातीला मुंबई-मंगलोर, पंजाब मेल, कोणार्क, दादर-चेन्नई इग्मोर एक्स्प्रेस या चार गाड्यांमध्ये ही सेवा लागू झाली असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
Post Top Ad
05 June 2015
Home
Unlabelled
रेल्वेच्या कोच स्वच्छतेसाठी रेडिओ टॅग
रेल्वेच्या कोच स्वच्छतेसाठी रेडिओ टॅग
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

