मुंबई १३ ऑक्टोबर २०१५ / अजेयकुमार जाधव
बेस्ट कर्मचाऱ्यांना गेले ३० वर्षे सातत्याने बोनस दिला जात होता. परंतू गेल्या ३ वर्षात आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे कारण देत बोनस नाकारण्यात आला आहे. बेस्टला या वर्षी ६७ कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याने या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा अशी अपेक्षा आहे. बोनसबाबत येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास २६ ऑक्टोबर पासून संप पुकारला जाईल असा इशारा बेस्ट कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
बेस्ट कर्मचारी केनेडियन शेडूल्ड मुळे मानसिक व शारीरिक रित्या त्रस्त झाले आहेत. कर्मचारी तरीही काम करून बेस्टचीसेवा करत आहेत. परंतू बेस्ट प्रशासन मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. बेस्ट महाव्यावास्थापकांकडे सर्वच युनियनने बोनस मिळावा अशी मागणी केली आहे. महाव्यवस्थापकांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असले तरी नुसत्या आश्वासनावर यावेळी आम्ही गप्प बसणार नाही. यावर्षी काहीही झाले तरी बोनस घेवूच असा विश्वास शशांक राव यांनी व्यक्त केला आहे. बेस्टला २२५० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे हा तोटा मातृसंस्था म्हणून मुंबई महानगरपालिकेने भरून काढावा अशी मागणी शशांक राव यांनी केली. कृती समितीच्या मागण्यांना आमचा पाठींबा आहे. कामगार आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करू शकतात, असे आंदोलन बेस्ट कर्मचारी करत असतील तर आमचा या आंदोलनाला पाठींबा असेल असे राव यांनी सांगितले.
आमची बेस्ट मध्ये सत्ता असली तरी कामगारांच्या मागण्यांसाठी कामगारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले. केनेडियन शेडूल्ड कामगारांवर लादण्याचा प्रयत्न झाल्यासबेस्ट कामगार सेना टोकाची भूमिका घेईल. व्हेरीयेबल डीए कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करू देणार नाही. कृती समितीची जो काही निर्णय घेईल त्याला बेस्ट कामगार सेनापाठींबा देईल असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सामंत यांनी सांगितले सांगितले. बेस्ट कामगारांना बोनस दिला जात नसताना मुंबई महानगरपालिका तसेच इतर परिवहन विभागातील बोनस दिला जातो. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांवर हा अन्याय असल्याने प्रशासनाने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करावा अशी मागणी सामंत यांनी केली.
बेस्ट कामगारांची सभा २५ ऑक्टोबर रोजी कामगार मैदानावर होत आहे. या सभेपूर्वी बोनस जाहीर न झाल्यास २५ ऑक्टोबरला रात्री १२ वाजल्यापासून २६, २७, २८ ऑक्टोबर हे तीन दिवस सत्यागृह आंदोलन केले जाईल. या आंदोलनामुळे रस्त्यावर एकही बस धावणार नाही असे कृती समितीचे निमंत्रक के. एस. अहिरे यांनी सांगितले. बेस्ट कर्मचारी २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान सत्यागृह आंदोलन करणार असल्याने हा संप कामगार स्वताहून सुरु कारनार आहेत. याचा फटका बेस्टने प्रवास करणाऱ्या ३० लाख प्रवाश्यांना बसणार आहे.
