एन प्रभाग कार्यालयात सहाय्यक आयुक्तची नियुक्ती करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2015

एन प्रभाग कार्यालयात सहाय्यक आयुक्तची नियुक्ती करा

मुंबई (प्रतिनिधी) - घाटकोपर एन प्रभाग कार्यालयात सहाय्यक आयुक्त नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सहाय्यक आयुक्ताची तात्काळ नियुक्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी उत्तर पूर्व विभाग यूथ कॉंग्रेसचे कार्यकारी अधिकारी दीपक जाधव यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून येथे सहाय्यक आयुक्त नाही. परिणामी प्रभागातील नागरिविकास कामे खोळंबली आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करून ही प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र, तक्रारींचा वेग वाढू लागल्याने ऐ. ई. मेन्टेंन्स विभागाचे व्दिवेदी यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. परंतु, त्यांनी कामे करण्याऐवजी वातानुकूलित कार्यालयात बसणे पसंत करीत, असल्याचा जाधव यांचा आरोप आहे. व्दिवेदी गेली 20 वर्ष मेन्टनेस विभागात काम करीत आहेत. मात्र, त्यांनी आतापर्यंत कामच केले नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करून दुसऱ्या अधिकाऱ्याची सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS