रस्ते स्वच्छता योजना निविदांमधील काही अटी व शर्ती शिथिल करण्यास मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2015

रस्ते स्वच्छता योजना निविदांमधील काही अटी व शर्ती शिथिल करण्यास मंजुरी


9 Oct 2015 महापालिका हद्दीतील रस्ते स्वच्छता करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमधील काही अटी व शर्ती शिथिल केल्यास अथवा त्यात बदल केल्यास अधिकाधिक बिगर शासकीय संस्थांना कामे मिळून त्यांना स्वयंरोजगार प्राप्त होऊ शकेलअशी विनंती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी गटनेत्यांच्या सभेत आज (दिनांक ०९ ऑक्टोबर२०१५केलीत्यास गटनेत्यांच्या सभेने मंजुरी दिली आहे.


महापालिकेच्या २४ विभागांमध्ये रस्ते स्वच्छता योजनेतंर्गत नव्याने काढण्यात आलेल्या निविदांमधील कंत्राटी कामगार नियम व निर्मूलन कायदा १९७० अन्वये परवानाकामगार राज्य विमा योजना १९४८ अंतर्गत नोंदणी,कामगार भविष्य निर्वाह अधिनियम १९४२ अंतर्गत नोंदणी या अटी अनिवार्य करण्यात आल्या आहेततथापिया अटी कंत्राट मिळाल्यानंतर पूर्ण करण्याची शिथिलता प्रदान करावी अथवा त्यात बदल करावेतजेणेकरुन स्थानिक बिगर शासकीय संस्थांना कामे मिळून स्वयंरोजगार मिळण्यास मदत होईलया आशयाची विनंती माजी महापौर तथा आमदार सुनील प्रभू आणि नगरसेवक उदेश पाटेकर यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांचेकडे केली होती. फणसे यांनी या संदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या सभेपुढे सदर पत्र विचारार्थ पाठविले होतेया अटी शिथिल करण्यासयोग्य ते बदल करण्यास गटनेत्यांच्या सभेने मान्यता दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS