मुंबई महानगरपालिकेची नवीन आरजीपीजी पालीसी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2015

मुंबई महानगरपालिकेची नवीन आरजीपीजी पालीसी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर

मुंबई 9 Oct 2015 (प्रतिनिधी): मुंबई महानाग्पालीकेच्या वतीने उद्याने, मनोरंजन मैदान, खेळाचे मैदान व उपवने दत्तक तत्वावर देण्याबाबतचे प्रस्तावित नवीन धोरणास आज गटनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मंजुरी दिली . पालिकेची  गार्डन  दत्तक घेणाऱ्या संस्थांना प्रती व्यक्ती २ रुपये शुल्क आकारता येणार असून ज्या संस्थेने सदर भूखंडावर  १ कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली असल्यास प्रतिव्यक्ती ५ रुपये शुल्क आकारण्याची परवानगी या नवीन पालीसी मध्ये  देण्यात आली आहे.  या नवीन धोरणामुळे ज्यांनी अतिरिक्त बांधकामे केली आहेत त्यांचे भूखंड  पालिकेला परत घेत येणार आहे.

पालिकेकडून मुंबईतील काही भूभाग याआधी काळजीवाहू तत्वावर देण्यात आलेले आहेत ते तसेच ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राजकीयदृष्ट्या विचार करून घेण्यात आलेला आहे. ज्या संस्थांनी काळजीवाहू तत्वावर परिरक्षित करण्याकरिता भूभाग घेतले असतील त्यांनी ३१ डिसेंबर २०१४ रोजी पर्यंत  विनंती केली असल्यास व सदर भूभाग विकसित करण्याकरिता सदर संस्थेने ३ कोटी रुपये खर्च केल्याचे पुरावे सादर  केल्यास सदर संस्थांचा अर्ज ग्राह्य  धरण्यात येणार आहे. भूभाग काळजी वाहू तत्वावर घेणाऱ्या संस्थेने एकूण सदस्य संस्थेपेक्षा ३० टक्के इतक्या स्थानिक नागरिकांना एकूण सदस्य शुल्काच्या २० टक्के शुल्क आकारून सदस्यत्व  देणे बंधनकारक आहे.

खेळाची मैदाने / मनोरंजन मैदाने याकरिता विशिष्ट अटी व शर्ती
खेळाचे मैदान 
१. मैदानाचे नामकरणाचे सर्व अधिकार महापालिकेकडे राहतील तसेच कोणत्याही परिस्थितीत दत्तक  तत्वावर भूखंड दिलेल्या संस्थेस मैदानाचे नामकरण करता येणार नाही.
२. मैदानावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नहि. फक्त महापालिकेने विनिर्देशित केल्याप्रमाणे शौचालयाचे  बांधकाम करता येईल.
३. मैदानाच्या कडेने केनोपी/ परगोल्याचे  बांधकाम करता येईल
४.  जर मैदान दत्तक घेणाऱ्या संस्थेने विशिष्ट  खेळांकरिता सुविधा निर्माण केल्यास सदरहू संस्थेस विकसित केलेले मैदान किमान ७ वर्षाकरिता परीरक्षित करण्याची परवानगी देण्यात येईल.
५. जर संस्थेने दत्तक घेतेलेल्या मैदानावर खेळांकरिता  कोणत्याही विशिष्ट सुविधा निर्माण  केल्या नसतील तर सदर संस्थेचा परिरक्षण कालावधी हा एकाच वेळी ३ वर्ष इतका  असेल.
६.  खेळाचे मैदान हे वैयक्तिकरीत्या कोणत्याही व्यक्तीस दत्तक तत्वावर देता येणार नाही.
७.  खेळाकरिता विशिष्ट सुविधा निर्माण करू इच्छीणाऱ्या संस्थाना विशेष प्राधान्य दिले जाईल. ८. भूखंड दत्तक घेणाऱ्या संस्थेस ५ पेक्षा जास्त नामफलक लावता येणार नाहीत. सदर फलकाचे मोजमाप ६" * २" इतक्या मापाचे असावे.


मनोरंजन मैदान
१.  मनोरंजन मैदानवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम, विनिर्देशित केल्याप्रमाणे शौचालय बांधकाम,तसेच भासल्यास केनोपी/ पर्गोल्याचा बांधकामास पर्न्वंगी ज्ञात येईल.
२ मनोरंजन मैदान हे वैयक्तिकरित्या कोणत्याही व्यक्तीस दत्तक देत येणार नाही.
३ भूखंड दंतक घेणाऱ्या संस्थेस ५ पेक्षा जास्त नामफलक लावता येणार नाहीत. महापालिकेने निर्दिष्ट केल्याप्रमाणे फलक ६"/२" इतकेच असेल. फलक मराठी इंग्रजी व इतर कोणत्याही भाषेत लावण्यात यावा.
४ मान्यताप्राप्त राष्ट्रीय/ राज्यस्तरीय क्रीडा संस्था /फेडरेशन यांना मनोरंजन साठी सोई सुविधा पुरविण्याबाबत पात्र संस्थेस बांधकामाकरिता विकास नियंत्रण नियमावलीला अधीन राहून पालिकेची विशेष परवानगी देता  येईल. 

Post Bottom Ad

JPN NEWS