बाबासाहेबांच्या स्मारकाचा आज कोनशीला समारंभ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेबांच्या स्मारकाचा आज कोनशीला समारंभ

Share This
स्मारकात लाईव्ह म्युझीयम, जगातला भव्य स्तूप, चवदार तळे, भाषणे, पुस्तके, अ‍ॅप
लाईव्ह म्युझीयममध्ये बाबासाहेब लोकांशी संवाद साधणार 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
इंदु िमलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा कोनशीला समारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ४५० कोटी रुपये खर्च करून बाबासाहेबांचे स्मारक येत्या तीनएक वर्षात उभे राहील असे राज्य सरकारचे नियोजन आहे. इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य स्मारकाचा आराखडा मुंबईतील नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू यांनी बनवलेला आहे. २ लाख ४० हजार चौ. मी. क्षेत्रफळाचे बांधकाम असलेल्या या स्मारकात नाट्यगृह, वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय, बाबासाहेबांचा पुतळा, भव्य असा स्तुप तसेच चवदार तळे साकारण्यात येणार असून ८० टक्के जागा मोकळी ठेवण्यात येणार आहे. स्मारकात प्रवेश केल्या केल्या बाबासाहेबांचा ७० फूट उंचीचा पतुळा दिसेल. तेथून तुम्ही भव्य अशा स्तुपाच्या पोकळ प्रतिकृतीखाली जाल. हा स्तूप स्मारातील मोठे आकर्षण आहे. त्यांनतर तुम्हाला म्युझियमकडे जाता येईल. सात मजली या म्युझीयममध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग येथे िदसेल.

नागपूरच्या दिक्षाभूमीवरील स्तूपापेक्षा अतिभव्य स्तूपाची प्रतिकृती उभारण्यात येणार असून चौदा मजल्या इतकी उंची असलेल्या या स्तूपामध्ये एकाचवेळी तब्बल १३ हजार बौद्ध भिक्खू विपश्यना आणि ध्यानधारना करु शकतील. या स्तूपाचा व्यास ८० मीटर (२७० फूट) असेल तर उंची ४० (१४० फूट) मीटर ठेवण्यात आली आहे. स्तूप िवटांचा आिण भरीव असतो. परंतु इंदु मिल स्मारकात स्तूपाची प्रतिकृती लोखंडी असणार आहे. हा स्तूप पोकळ तर आहे, परंतु तो संपूर्ण लोखंडी आहे. आंबेडकर स्मारकाची जागा समुद्र किनारी आहे. त्यामुळे या स्तूपाच्या लोखंडी प्रतिकृतीवर दमट हवामानाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यावर िवशिष्ट लेप लावण्यात येणार आहे. स्मारकातील या लोखंडी स्तूपासाठी तब्बल ११० कोटी ९५ लाख रुपये खर्च येणार आहे.

या स्मारकात ३ हजार ६८१ चौ. मी. वस्तुसंग्रहालय आहे. त्यात बाबासाहेबांचे आरंभकालीन जीवन, त्यांचा संघर्ष, विविध आंदोलने या संदर्भातील चित्रे असतील. तसेच या वस्तुसंग्रहालय चार विशेष गॅलऱ्याही आहेत. त्यात राज्यघटना गॅलरी, पुनरुत्थान गॅलरी, संघर्ष गॅलरी आिण भावी पिढीला संदेश अशी त्यांची नावे आहेत. वस्तुसंग्रहालयातील दृकश्राव्य गॅलरीत बाबासाहेब तुमच्याशी बोलतील. बाबासाहेबांना तुम्ही त्यांच्या जीवनाशी, त्यांच्या कार्याशी, सामाजिक प्रश्नाबाबत कोणताही प्रश्न िवचारु शकाल. त्याला बाबासाहेब स्वत: उत्तर देतील. अगदी तुमच्या समोर बाबासाहेब उभे राहून संवाद साधतील. या अत्याधुनिक पद्धतीच्या वस्तुसंग्रहालयासाठी तब्बल १७ कोटी ५४ लाख खर्च केले जाणार आहेत. स्मारकाच्या समुद्रकाडील बाजूस नाट्यगृह आणि ग्रंथालय असणार आहे. नाट्यग्ृहाची बाराशे आसनांची क्षमता असून त्याला कॉमन प्लाझा आहे. 

इंग्लंडच्या ह्यलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून बाबासाहेबांनी पीएच. डी. पूर्ण केली. बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेचा बराच काळ अध्ययनासाठी याच ग्रंथालयात व्यतीत केला. त्या ग्रंथालयातच्या धर्तीवर स्मारकात वर्तुळाकार ग्रंथालय बनवण्यात येत आहे. या ग्रंथालयाचा व्यास १५० चौ. मी. असून संशोधकांना उपयोगी पडतील असे उत्तोमउत्तम ग्रंथ येथे असतील. बाबासाहेबांची पुस्तके, त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांची दुर्मिळ चित्रे, त्यांची भाषणे, त्यांचे लेख हे सारं काही या ग्रंथालयात तुम्हाला अ‍ॅपव्दारे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येईल. स्मारकातील या मॉर्डन ग्रंथालयासाठी ९ कोटी खर्च करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्याचे पाणी चाखून माणूस म्हणून जगण्याचा दलितांनाही अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले. बाबासाहेबांनी समतेसाठी पुकारलेल्या धर्मयुद्धातील पहिली ठिणगी याच तळ्याने सर्वप्रथम अनुभवली. बाबासाहेबांच्या सत्याग्रहाने अजरामर झालेले चवदार तळे जिवंत झऱ्याच्या ठिकाणी इंदू मिल मध्ये साकारले जाणार आहे. या तळ्याकाठी महाड सत्याग्रहाचे ब्रांझचे विशाल शिल्प बसवण्यात येणार आहे. 

स्मारकातील वैशिष्ठे 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुमच्याशी बोलणार 
- स्मारकात लाईव्ह म्युझीयम
- बाबासाहेबांची भाषणे, पुस्तके अ‍ॅपमध्ये िमळणार
- जगातला भव्य स्तूप होणार इंदु िमल स्मारकात 
- दिक्षा भूमीपेक्षा मोठा असेला आंबेडकर स्मारकातील स्तूप
- १४ मजली उंची इतक्या िवशाल स्तूपासाठी ११० कोटीचा खर्च
- इंदु मिल स्मारकात साकारणार चवदार तळे 
- तळ्याकाठी असेल महाड सत्याग्रहाचे िवशाल समूहशिल्प 
- मिलमधील िजवंत झऱ्यांमुळे तळे बारामाही असेल कोठोकाठ 
- स्मारकाची कंपाऊंड भिंत स्तुपाच्या वेदिका वास्तुकलेप्रमाणे बनवलेली आहे. ज्यामुळे बाहेरील गोंगाट बाहेरच थोपवला जातो. 
- स्मारकातील चवदार तळ्याच्या या हुबेहुब प्रतिकृतीसाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. 
- साडेबारा एकराच्या या स्मारकात ८० टक्के जागा मोकळी असून २ लाख ४० हजार ५०० चौ. फू. इतके बांधकाम आहे.
- स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार असून स्मारकाचा एकूण खर्च ४२५ कोटी १६ लक्ष रुपये इतका अपेक्षीत आहे.



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages