मुलुंडमधील पुलासाठी प्रकाश गंगाधरे यांनी घेतली रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुलुंडमधील पुलासाठी प्रकाश गंगाधरे यांनी घेतली रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट

Share This

मुलुंड येथील अपना बाझार ते मिठागर रस्त्यावरील पुलाला मध्य रेल्वेने ना हरकत पत्र दिले नसल्याने ब्रिज चे काम खोळंबले आहे. मध्य रेल्वेने या पुलाच्या बांधकामासाठी त्वरित ना हरकत पत्र द्यावे या मागणी साठी भाजपाचे नगरसेवक व सुधार समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुलाच्या बांधकामासाठी ना हरकत पत्र देण्यासाठी सहमत असल्याचे शर्मा यांनी म्हटल्याचे गंगाधरे यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages