Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्या - पालिका आयुक्त


मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या ६७ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त दादर परिसरातील चैत्‍यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुवधा योग्यप्रकारे मिळतील, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी – कर्मचारी, मुंबई पोलिस यांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही आयुक्‍तांनी दिल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापरिनिर्वाण दिन समन्वय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी आयुक्‍त बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, मुंबई पोलिस दलाचे उप आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त (परिमंडळ - २) रमाकांत बिरादार, उप आयुक्‍त (घन कचरा व्यवस्थापन) चंदा जाधव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिनांक ६ डिसेंबर २०२३ च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था इत्यादी बाबींची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

वरील अनुषंगाने उपस्थितांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात उत्‍तमोत्‍तम सेवा - सुविधा पुरविण्‍याचे नियोजन करण्यात येत आहे. तथापि, याबाबत ज्या ठिकाणी गरज असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी आजच्या बैठकी दरम्यान संबंधित अधिका-यांना दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्‍य समन्‍वय साधून कार्यवाही करण्याचे आणि अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेशही आयुक्‍तांनी आज दिले. 

या बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. भदंते राहूल बोधी – महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्‍यक्ष महेंद्र साळवे, उपाध्‍यक्ष रवी गरुड, भिकाजी कांबळे, रमेश जाधव, श्रीकांत भिसे, संजय पवार, अरविंद निकाळजे, प्रतिक कांबळे, सो. ना. कांबळे, विलास रुपवते, मनोल गायकवाड, प्रदीप कांबळे, दिपक क्षीरसागर, डि. एम. आचार्य, अमोल साळुंके, ऊषा रामलू, निशा मोदी, सुनिती मोरे आदींसह विविध संस्थांचे मान्यवर, पदाधिकारी देखील उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom