क्रीडापटूंसाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2025

क्रीडापटूंसाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग


मुंबई - दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी अत्याधुनिक उपचार आणि पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देणारे राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय हे मुंबईतील तसेच शासकीय रुग्णालयांमधील पहिले रुग्णालय ठरणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. 

केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग सुरू करण्यात येत असून, २० रुग्णशय्यांच्या विशेष कक्षामार्फत क्रीडापटूंना एकाच छत्राखाली सर्व उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

परळ येथील केईएम रुग्णालयात क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या Sports Injury and Rehabilitation Centre चे लोकार्पण गगराणी यांच्या हस्ते रविवारी (१४ डिसेंबर २०२५) करण्यात आले. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, अस्थिरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई, बालकृष्ण इंडस्ट्रीच्या विजयालक्ष्मी पोद्दार, अरविंद पोद्दार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गगराणी म्हणाले की, क्रीडा क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित या केंद्रामुळे क्रीडापटूंच्या उपचारासोबतच पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे. खासगी क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीतून बालकृष्ण इंडस्ट्रीने दिलेल्या आर्थिक सहाय्यामुळे हे केंद्र साकार झाले असून, केईएम रुग्णालयाची निवड होणे ही आनंदाची बाब आहे. या सुविधांमुळे केईएम रुग्णालयाची देशपातळीवरील क्रमवारी उंचावण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या महानगरात क्रीडापटूंसाठी समर्पित उपचार केंद्र उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या केंद्रात उपचार घेऊन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना याचा निश्चित लाभ होईल, असेही गगराणी यांनी नमूद केले.

या केंद्रात आर्थोस्कोपी शल्यचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, बायोफिजिसिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशा तज्ज्ञांची सेवा एकाच छत्राखाली उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुरक्षेसह सर्व वयोगटांतील रुग्णांसाठी येथे उपचार दिले जाणार आहेत.

क्रीडापटूंना आवश्यक असणाऱ्या टेकार थेरपी, अल्ट्रासोनिक थेरपी, इंटरफेरेन्शिअल थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, आईस अँड हीट थेरपी यांसह अत्याधुनिक उपचार पद्धती येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उपचार व पुनर्वसन केंद्रातील प्रमुख सुविधा - 
अंडरवॉटर ट्रेडमिल

डी-वॉल आणि वॉकर व्ह्यूव्ह मशीन

झिरो ग्रॅव्हिटी ट्रेडमिल

एरोलॅप आणि डायनेलॅब

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS