यंग, क्रेझी आणि फुल मजा! ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर प्रदर्शित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2025

यंग, क्रेझी आणि फुल मजा! ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर प्रदर्शित


मुंबई - आमिर खान प्रोडक्शन्सची नवी जासूसी कॉमेडी ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रचंड हास्य, धमाल आणि हटके विनोदांनी भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

वीर दास दिग्दर्शित या चित्रपटात ते स्वतः प्रमुख भूमिकेत दिसत असून, मोना सिंह, मिथिला पालकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये वीर दास एका थोड्याशा इम्परफेक्ट पण मजेशीर जासूसच्या भूमिकेत दिसतात. मिशनदरम्यान घडणाऱ्या गोंधळातून उलगडणारी कथा प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ठरणार असल्याचे संकेत ट्रेलरमधून मिळतात.

मोना सिंह या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या आणि दमदार अंदाजात दिसत असून, मिथिला पालकर आपल्या निरागस चार्मने कथेला वेगळी रंगत आणतात. यासोबतच आमिर खान यांचा अनोखा आणि वेगळा लूक ट्रेलरमध्ये विशेष आकर्षण ठरतो.

आमिर खान प्रोडक्शन्सने याआधी लगान, तारे जमीन पर, दंगल, सीक्रेट सुपरस्टार यांसारखे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’द्वारे पुन्हा एकदा हटके आणि मनोरंजक विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन वीर दास यांच्यासोबतची ही भागीदारी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS