३१ डिसेंबरला हुल्लडबाजी, स्टंट किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यास थेट जेल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2025

३१ डिसेंबरला हुल्लडबाजी, स्टंट किंवा ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यास थेट जेल


मुंबई - सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत तब्बल १७ हजार पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरवण्यात आले असून, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विशेष बदल आणि ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे, नाशिकसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वांद्रे बँडस्टँड यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवले जात आहे.

मुंबईत १७ हजार पोलीस तैनात - 
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी SRPF, QRT आणि स्थानिक पोलीस दलाच्या विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. छेडछाड, हुल्लडबाजी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीसही असणार आहेत. मुख्य नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरभर लक्ष ठेवले जाणार आहे.

ड्रिंक अँड ड्राईव्हवर कडक कारवाई - 
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाणार असून, ठिकठिकाणी ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी स्टंट, बेकायदेशीर रेसिंग किंवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर जेलची कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्साहात पण नियमांच्या चौकटीत राहूनच नवीन वर्षाचे स्वागत करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

वाहतुकीत मोठे बदल - 
दक्षिण मुंबई: मरिन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहन प्रवेश मर्यादित, काही रस्ते नो पार्किंग व वन-वे

पश्चिम उपनगरे: जुहू, वांद्रे बँडस्टँड परिसरात सायंकाळनंतर वाहतूक डायव्हर्जन

नाकाबंदी: प्रमुख चौकांत तपासणी नाके, संशयास्पद वाहनांची कसून तपासणी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS