घाटकोपरमध्ये अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; “त्रिवेदी पान हाऊस”वर बुलडोझर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2026

घाटकोपरमध्ये अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; “त्रिवेदी पान हाऊस”वर बुलडोझर


मुंबई - घाटकोपर पूर्व येथील टिळक रोड परिसरातील “त्रिवेदी पान हाऊस” या दुकानातून अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत संबंधित दुकान निष्कासित केले. पंतनगर पोलीस आणि पालिकेच्या ‘एन’ विभागाच्या संयुक्त कारवाईत हे पाऊल उचलण्यात आले.

स्थानिक नागरिकांकडून परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ कारवाई करत दुकानावर बुलडोझर चालवला.

ही कारवाई स्थानिक आमदार पराग शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नगरसेविका राखी जाधव आणि नगरसेवक धर्मेश गिरी यांनी यासाठी पुढाकार घेतला.

कारवाईनंतर नगरसेविका राखी जाधव यांनी सांगितले की, “अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परिसरातील शांतता आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांविषयी तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी.”

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अमली पदार्थांविरोधात प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS