Rail One App मध्ये तांत्रिक बिघाड; तिकीट बुकिंग ठप्प, प्रवाशांचा खोळंबा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2026

Rail One App मध्ये तांत्रिक बिघाड; तिकीट बुकिंग ठप्प, प्रवाशांचा खोळंबा


मुंबई | जेपीएन न्यूज - 
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेल्या रेलवन (RailOne) ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी तिकीट काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲपमध्ये यापूर्वी बुक केलेले मासिक आणि सीझन पास दिसत असले तरी नवीन तिकीट किंवा पास बुक करता येत नाही. तिकीट बुकिंगचा पर्याय कार्यरत नसल्याने अनेकांना स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर रांगा लावाव्या लागल्या.

ऑनलाइन तिकीट सुविधेवर अवलंबून असलेल्या नियमित प्रवाशांचा यामुळे मोठा खोळंबा झाला. अनेकांनी सोशल मीडियावर रेलवन ॲपमधील तांत्रिक अडचणींबाबत तक्रारी नोंदवत, सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणेकडून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS