वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावात पोहताना १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2026

वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावात पोहताना १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू


मुंबई JPN NEWS - वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात पोहताना एका १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२२ ऑगस्ट) दुपारी घडली.

बाणगंगा तलावात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती दुपारी सुमारे १.१० वाजता मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

मात्र, एलिझाबेथ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेखर हरीश रावल (वय १९) यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिका विभागीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS