विद्याविहार-महात्मा गांधी मार्ग रस्ता रुंदीकरणासाठी २८ बांधकामे हटवली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2026

विद्याविहार-महात्मा गांधी मार्ग रस्ता रुंदीकरणासाठी २८ बांधकामे हटवली


मुंबई JPN NEWS - विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील राजावाडी मार्ग क्रमांक-७ ते महात्मा गांधी मार्ग जंक्शनदरम्यान प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता वेग आला आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित होणाऱ्या २८ बांधकामांवर महापालिकेच्या ‘एन’ विभागाकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

महापालिकेने शुक्रवारी (२१ ऑगस्ट) विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या एकूण बांधकामांपैकी २८ बांधकामे हटविण्यात आली असून, उर्वरित १९ बांधकामांचेही लवकरच निष्कासन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

या कारवाईदरम्यान ‘एन’ विभागातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रस्ता रुंदीकरणामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS