
मुंबई JPN NEWS - म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध म्हाडा वसाहतींमधील ८ सुविधा भूखंडांचे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ऑनलाइन वितरण करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे.
मालाड-मालवणी, टागोर नगर-विक्रोळी, कन्नमवार नगर-विक्रोळी, गोराई आणि आकुर्ली येथील सुविधा भूखंड या प्रक्रियेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भूखंडांचे वितरण तीन टप्प्यांत केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील बुकिंग २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र व अपात्र अर्जदारांची यादी १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात शिल्लक राहिलेले तसेच नव्याने समाविष्ट होणारे भूखंड दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध करून दिले जातील. या टप्प्याची प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू होणार असून, अर्जाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे. पात्र-अपात्र अर्जदारांची यादी १० ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल.
त्यानंतर शिल्लक भूखंडांसाठी तिसरा टप्पा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर असून, पात्र व अपात्र अर्जदारांची यादी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
अर्जदारांना ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून निर्धारित अनामत रक्कम (EMD) जमा करावी लागणार आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती पुस्तिका, पात्रता निकष, अटी-शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन म्हाडाने केले आहे.
ऑनलाइन अर्ज, माहिती पुस्तिका आणि सविस्तर अटी व शर्तींसाठी https://eauction.mhada.gov.in/MumbaiBoardFcfsPlot व https://mhada.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी ०२२-६६४०५१२५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment