माऊंट मेरी यात्रेसाठी BESTच्या २३६ अतिरिक्त बसगाड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2026

माऊंट मेरी यात्रेसाठी BESTच्या २३६ अतिरिक्त बसगाड्या


मुंबई JPN NEWS - वांद्रे (प.) येथील प्रसिद्ध माऊंट मेरी यात्रेनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने विशेष नियोजन केले आहे. रविवार, १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत वांद्रे रेल्वे स्थानक (प.) आणि हिलरोड उद्यानदरम्यान २३६ अतिरिक्त बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत.

माऊंट मेरी यात्रेला मोठ्या संख्येने भाविक आणि प्रवासी उपनगरीय रेल्वेने वांद्रे स्थानकात येतात. त्यानंतर माऊंट मेरी चर्च परिसरात जाण्यासाठी बेस्ट बससेवेचा वापर केला जातो. यामुळे या काळात वांद्रे स्थानक परिसरात मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

माऊंट मेरी चर्च तसेच फादर अँगल आश्रम परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता अतिरिक्त बसगाड्या थेट चर्चपर्यंत नेणे शक्य नसल्याने वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिलरोड उद्यान या मार्गावर त्यांचे प्रवर्तन करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे परिसरातील गरजेनुसार अतिरिक्त बससेवाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

बसनिरीक्षक, वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती - 
यात्रेच्या कालावधीत वांद्रे स्थानक आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य करण्यासाठी बेस्टतर्फे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यात्रेच्या काळात प्रवाशांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS