Mumbai Crime वांद्रे पोलिसांची अमली पदार्थविरोधी कारवाई; २.१० लाखांचे एमडी जप्त, तिघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2026

Mumbai Crime वांद्रे पोलिसांची अमली पदार्थविरोधी कारवाई; २.१० लाखांचे एमडी जप्त, तिघांना अटक


मुंबई JPN NEWS - वांद्रे पश्चिम परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी कारवाई करत १४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. या अमली पदार्थाची अंदाजित किंमत २ लाख १० हजार रुपये असून, या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.१५ वाजता एस. व्ही. रोडवरील कुरेशी नगर मैदान परिसरात गस्त घालत असताना पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला कलीम शमीम शेख (वय ३२) याच्याकडे एमडी हा अमली पदार्थ आढळला. पंचांसमक्ष पंचनामा करून हा पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२०२/२०२६ अंतर्गत अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ च्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करून कलीम शेख याला अटक करण्यात आली.

तपासादरम्यान कलीम शेख याने निलोफर सँडोले (वय ५०) आणि फिरोज शेख उर्फ फिरोज चिकना (वय ६१) यांच्यासोबत मिळून अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन या दोघांनाही अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र नांगरे करत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS