मुंबईत १३ सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार; उत्तर परिमंडळ-३ पोलिसांची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2026

मुंबईत १३ सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार; उत्तर परिमंडळ-३ पोलिसांची कारवाई


मुंबई JPN NEWS - शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. उत्तर परिमंडळ-३ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १३ गुन्हेगारांना मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींविरुद्ध मारहाण, धमकावणे, हप्तेवसुली, खंडणी, जबरी चोरी, घातक शस्त्रांचा धाक दाखवणे आणि अमली पदार्थांच्या विक्रीसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांशी संबंधित नोंदींचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या कथित गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

वनराई, कुरार, समतानगर आणि दहिसर पोलिसांची कारवाई - 
हद्दपारीची कारवाई वनराई, कुरार, दिंडोशी, समतानगर आणि दहिसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संबंधित व्यक्तींविरुद्ध करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६ आणि ५७ अंतर्गत प्रस्ताव सादर करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आले.

या कारवाईत नईम शहाबुद्दीन थोबी, सुभाष मोतीलाल पटेल, योगेश बाबुराव वाघमारे, सुरेश विजय माला उर्फ नेपल्या, अजय दिनेश द्विवेदी, धीरज विजय गोरगावकर, जतीन बबन जावळे उर्फ जेत्या, जयप्रकाश पुदियापुरावेल उर्फ बाबू, दिपांशू जयशंकर सिंग, आशिष विनोद यादव, कुशल सुभाष दुबे, आयुब सरवरअली अन्सारी आणि महेश अमरसिंग चौहान उर्फ भांज्या यांचा समावेश आहे.

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई - 
हद्दपार केलेल्या व्यक्तींनी आदेशाचे उल्लंघन करून मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यास अथवा तेथे वास्तव्यास असल्याचे आढळल्यास संबंधित कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिसरात हद्दपार व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्याला किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS