Mumbai मुंबईत ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाखा; सांताक्रूझमध्ये ३७.६ अंश तापमानाची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2026

Mumbai मुंबईत ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाखा; सांताक्रूझमध्ये ३७.६ अंश तापमानाची नोंद


मुंबई JPN NEWS - मुंबईत ऑक्टोबर महिन्यातच उन्हाचा कडाका वाढला असून, शहरातील तापमानाने नागरिकांना हैराण केले आहे. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

ऑक्टोबरमधील गेल्या आठ वर्षांतील हे सर्वाधिक तापमान ठरले. कुलाबा येथेही कमाल तापमान ३६.५ अंशांपर्यंत पोहोचले होते. वाढते तापमान आणि आर्द्रतेमुळे उकाड्यात भर पडली असून, भारतीय हवामान विभागाने मुंबईसह काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता.

हवामानातील प्रतिचक्रीवादळीय स्थितीमुळे समुद्राकडून येणारे थंड वारे कमकुवत झाल्याने तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सांताक्रूझमध्ये तापमान आणखी वाढून ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जास्त वेळ राहणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेशी संबंधित त्रास जाणवल्यास आवश्यक काळजी घ्यावी.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS