| मुंबई : अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात येणार नाही, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे मुख्यमंर्त्यांनंतर नंबर दोनची खुर्ची कोणत्या मंर्त्याला दिली जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने हा मान सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. अजितदादा पवार यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणालाही न देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बाजूची खुर्ची राष्ट्रवादी कोणत्या ज्येष्ठ मंर्त्याला देणार याबाबत उत्सुकता होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने हा मान छगन भुजबळ यांना दिला. गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसण्याचा मान छगन भुजबळ यांना देण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदावर निवड झाल्यानंतर पंतप्रधानांच्या बाजूची नंबर दोनची खुर्ची कोणाला मिळणार, यावरून मध्यंतरी वाद झाला होता. ए.के.अँण्टोनी यांना हा मान मिळाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे नाराजही झाले होते.तसाच काहीसा पेच राज्याच्या मंत्रिमंडळातही निर्माण झाला होता. |
Post Top Ad
05 October 2012
Home
Unlabelled
नंबर दोनच्या खुर्चीचा मान छगन भुजबळ यांना
नंबर दोनच्या खुर्चीचा मान छगन भुजबळ यांना
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment