| मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सुगंधी दूध गेले 21 दिवस दूधबाधेच्या प्रकरणामुळे बंद होते. मात्र हे दूध तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर या दुधाचा अहवाल अनुकूल आल्यामुळे गुरुवारपासून पालिकेच्या सर्व शाळांतून सुगंधीत दुधाचा पुरवठा सुरू करण्यात आला. या निर्णयामुळे पालिका शाळांमध्ये शिकणार्या गरीब विद्यार्थ्यांना पुन्हा सुगंधी दूध मिळू लागले आहे. गेली दोन वर्षे वादग्रस्त झाल्याने सुगंधी दुधाची योजना बंद झाली होती. यानंतर पुन्हा या वर्षीपासून दुसर्या कंपनीकडून दूध घेण्याचा निर्णय स्थायी समितीत घेतला गेला. या योजनेसाठी पालिका 122 कोटी रुपये खर्च करत आहे. या योजनेनुसार महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते 27 ऑगस्टपासून पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाचे वाटप सुरू केले गेले; परंतु दुर्दैवाने महापौरांनी सुरू केलेल्या शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे पालिका शाळेतील चार विद्यार्थ्यांना दूधबाधा झाल्यामुळे 22 दिवस सुरू असलेले हे दूध वितरण पालिकेला बंद करावे लागले. दरम्यान, या दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यास पाठवण्यात आले, मात्र प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर या दुधाचा अहवाल अनुकूल आल्यामुळे गुरुवारपासून पालिका शाळांमध्ये पुन्हा सुगंधी दूधवाटप सुरू करण्यात आल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. |
Post Top Ad
05 October 2012
Home
Unlabelled
सुगंधी दुधाचे वाटप पुन्हा सुरू
सुगंधी दुधाचे वाटप पुन्हा सुरू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment