मुंबई विद्यापीठाच्या बीकॉमसह ९ अभ्यासक्रमांचे हॉलतिकीट जाहीर; ६ ऑक्टोबरपासून परीक्षा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2026

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉमसह ९ अभ्यासक्रमांचे हॉलतिकीट जाहीर; ६ ऑक्टोबरपासून परीक्षा


मुंबई JPN NEWS - मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत बीकॉम सत्र ५ सह नऊ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे हॉलतिकीट महाविद्यालयांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिले आहेत.

या परीक्षांना ६ ऑक्टोबर २०२६पासून सुरुवात होणार आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचीच हॉलतिकिटे जाहीर करण्यात आली आहेत. अपूर्ण प्रक्रिया असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसांत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

हॉलतिकीट तयार होण्यासाठी मॅन्डेट जनरेशन, अभ्यासक्रमाची निवड, परीक्षा अर्ज भरणे व पडताळणी तसेच ABC ID लिंक करणे या प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी तातडीने आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून परीक्षा अर्जाची स्थिती तपासावी आणि प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करावी, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

या परीक्षांमध्ये बीकॉम, बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स, बँकिंग अँड इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल मार्केट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, मॅनेजमेंट स्टडीज आणि बीएमएस (E.M.E.) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

महाविद्यालयांनी उपलब्ध हॉलतिकिटांची पडताळणी करून ती विद्यार्थ्यांना वेळेत द्यावीत, तसेच विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट मिळाल्यानंतर परीक्षा केंद्र, विषय आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS