मुंबई : दसरा, दिवाळी सणांनिमित्त बाहेरगावी जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली स्थानकां दरम्यान एसी सुपर फास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या 48 फेर्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 09003 मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली एसी सुपर फास्ट स्पेशल ट्रेन 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी आणि शनिवारी मुंबई सेंट्रलहून संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून नवी दिल्ली येथे दुसर्या दिवशी संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 09004 नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल एसी सुपर फास्ट स्पेशल ट्रेन 10 ऑक्टोबर ते 30 डिसेंबरदरम्यान दर बुधवारी आणि रविवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी सुटणार असून मुंबई सेंट्रलला दुसर्या दिवशी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार आहे. या विशेष ट्रेनला बोरिवली, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, गंगापूर सिटी, भरतपूर आणि मथुरा या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. प्रवासी या ट्रेनचे आरक्षण 7 ऑक्टोबरपासून करू शकतात.
Post Top Ad
05 October 2012
Home
Unlabelled
मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली 48 फेर्या चालविण्यात येणार
मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली 48 फेर्या चालविण्यात येणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment