राज्यातील नर्सेस २४ फेब्रुवारीपासून संपावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2014

राज्यातील नर्सेस २४ फेब्रुवारीपासून संपावर

मुंबई : वारंवार होणारे हल्ले, मोठय़ा प्रमाणावरील रिक्त पदांची भरती, वेतनातील फरक, आवश्यक साधनांचा पुरवठा आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फाऊंडेशनने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. २४ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमधील २३ हजार नर्सेस बेमुदत संप पुकारणार असल्याची माहिती फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी दिली. अनेक ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांकडून नर्सेसवर हल्ले होतात. त्याबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी साधी पोलीस तक्रारही घेत नाहीत. त्यामुळे नर्सेसना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. यासह सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनाची पुनर्रचना, शैक्षणिक सुधारणा आदी मागण्यांसाठी आम्ही अनेक आंदोलने केली तरीही सरकार यावर निर्णय घेत नसल्याने संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS