मुंबई : रेल्वे अपघातांमागे केवळ रेल्वेचा फ्लॅटफॉर्म व लोकल ट्रेनच्या फूटबोर्डमधील अंतर एवढेच कारण नाही तर या अपघातांमागे अनेक कारणे आहेत, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. रेल्वे अपघातात मोनिका मोरे हिने आपले दोन्ही हात गमावल्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. त्या याचिकेसंदर्भात रेल्वे प्रशासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट केली आहे.केवळ रेल्वेचा फ्लॅटफॉर्म व लोकल ट्रेनच्या फूटबोर्डमधील अंतर यामुळे रेल्वे अपघात होत नाहीत, तर रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण, लोकलमधील गर्दी आदी अनेक कारणांबरोबरच मुंबईतील लोकल वाहतूक सेवा व लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी एकच रूळ असल्याने दोन्ही वाहतुकीसाठी एकाच रुळाचा वापर होतो. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फूटबोर्ड व प्लॅटफॉर्म यांच्यातील अंतर अधिक आहे. हे लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म बांधण्याची गरज असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Post Top Ad
13 February 2014
Home
Unlabelled
फ्लॅटफॉर्म व फूटबोर्डमधील अंतरामुळे अपघात होतात असे नाही - रेल्वे प्रशासन
फ्लॅटफॉर्म व फूटबोर्डमधील अंतरामुळे अपघात होतात असे नाही - रेल्वे प्रशासन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment