Post Top Ad
13 February 2014
Home
Unlabelled
दलितांच्या २३ हजार २५८ कोटींवर सरकारचा डल्ला - ललित बाबर
दलितांच्या २३ हजार २५८ कोटींवर सरकारचा डल्ला - ललित बाबर
नवी मुंबई : अनुसूचित जातीच्या लोकांना दारिद्रय़रेषेच्यावर आणणे आणि त्यांना स्वत:च्या उपजीविकेचे साधन मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने विशेष घटक योजना कार्यान्वित केली आहे. मात्र फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणार्या महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या या योजनेला हरताळ फासत अवघ्या १५ वर्षांत दलितांच्या हक्कांच्या २३ हजार २५८ कोटी रुपयांवर डल्ला मारून हे पैसे इतरत्र वळवल्याचे उघडकीस आल्याचा आरोप डॉ. आंबेडकर शेती विकास आणि संशोधन संस्थेचे अध्यक्ष ललित बाबर यांनी केला. दरम्यान, २0१३-१४ या आर्थिक वर्षासाठीच्या मंजूर अर्थसंकल्पातील बौद्धांसाठीचे २८१६.२७ कोटी रुपये या सरकारने नाकारल्याचा संतापजनक प्रकारही समोर आल्याचे बाबर यांनी म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment