CSMT वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक; १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर प्लॅटफॉर्म १४-१५ बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2026

CSMT वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक; १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर प्लॅटफॉर्म १४-१५ बंद


मुंबई JPN NEWS - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामामुळे मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. CSMT येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या CSMT पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर पायाभरणी आणि अन्य आवश्यक पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. काम पूर्ण होईपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे.

या ब्लॉकचा थेट परिणाम CSMTकडे येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार असून, १ ऑक्टोबरपासून आठ मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे अंतिम स्थानक बदलण्यात आले आहे. बल्लारशाह–CSMT नंदीग्राम एक्सप्रेस, हावडा–CSMT एक्सप्रेस, अमरावती–CSMT एक्सप्रेस, भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्सप्रेस, मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेस, बिदर–CSMT एक्सप्रेस आणि लातूर–CSMT एक्सप्रेस या सात गाड्या CSMTऐवजी दादर येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.

मंगळुरू–CSMT एक्सप्रेस ही गाडीही CSMTपर्यंत जाणार नसून ठाणे येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्यांनी CSMT किंवा दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दादर अथवा ठाणे येथे उतरून पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

प्रवाशांनी १ ऑक्टोबरपासून प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीचे अंतिम स्थानक तपासावे आणि दादर किंवा ठाणे येथून पुढील प्रवासासाठी पुरेसा वेळ राखून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दूरवरून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या अद्ययावत वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

CSMT पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधा आणि रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी हे ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्म रेल्वे वाहतुकीसाठी RLDAकडून मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

७५ दिवसांच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

CSMT पुनर्विकासासाठी महत्त्वाचा ब्लॉक -
रेल्वे विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत सुरू असलेल्या CSMT पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ येथे पायाभरणी आणि इतर आवश्यक पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्म रेल्वे वाहतुकीसाठी RLDAकडून मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS