सांताक्रुझमध्ये गटार सफाईदरम्यान दुर्घटना; एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2026

सांताक्रुझमध्ये गटार सफाईदरम्यान दुर्घटना; एकाचा मृत्यू


मुंबई JPN NEWS - सांताक्रुझ पूर्व येथील गोळीबार रोड क्रमांक ८ येथे सोसायटीच्या अंतर्गत सांडपाणी वाहिनीची सफाई करताना दोन खासगी कामगार गटाराच्या मॅनहोलमध्ये पडल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या घटनेत एका कामगाराचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

गोळीबार रोड क्रमांक ८ येथील भव्या निकेतन सोसायटीने इमारतीच्या अंतर्गत सिव्हर लाईनच्या सफाईचे काम खासगी व्यक्तींना दिले होते. सफाईचे काम सुरू असताना या खासगी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती न देता महापालिकेच्या सिव्हर मॅनहोलचे झाकण उघडल्याचे अग्निशमन विभागाच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

या वेळी दोन व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोघांची सुटका केली. त्यानंतर दोघांनाही १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यापैकी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर दुसऱ्या व्यक्तीला आवश्यक उपचारासाठी MICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS