‘बेस्ट’चे माजी उपमहाव्यवस्थापक पुराणिक अखेर बडतर्फ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

‘बेस्ट’चे माजी उपमहाव्यवस्थापक पुराणिक अखेर बडतर्फ


मीटर खरेदीत गैरव्यवहार आणि अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी बेस्टचे माजी उपमहाव्यवस्थापक (विद्युत पुरवठा) एस. ए. पुराणिक दोषी आढळले आहेत. त्यामुळे बेस्ट समितीने पुराणिक यांच्या बडतर्फीच्या प्रस्तावाला आज अखेर मंजुरी दिली.
पुराणिक यांच्यावर २०१० मध्ये पदाचा गैरवापर करणे आणि मीटर खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ज्या दिवशी पुराणिक हे बेस्टच्या सेवेतून निवृत्त झाले त्याच दिवशी सायंकाळी उशिरा त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राजन कोचर यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत पुराणिक यांची चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने सादर केलेल्या अहवालात पुराणिक दोषी आढळले. आज प्रस्ताव बेस्ट समितीत आला असता बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील यांनी पुराणिक यांना बडतर्फ करण्यात आलेे  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS