बीएसएनएल-विशटेलचा ईरा आयकॉन टॅबलेट बाजारात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2012

बीएसएनएल-विशटेलचा ईरा आयकॉन टॅबलेट बाजारात


मुंबई - दूरसंचार क्षेत्रात मोठा विस्तार असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) विशटेल या टॅबलेट पीसी निर्मात्या कंपनीसोबत करार करीत "ईरा आयकॉन' या ट्रिपल प्ले टॅबलेट पीसीचे नुकतेच लॉचिंग केले आहे. विशेष म्हणजे (ता. 1) बीएसएनएल दिवसाच्या निमित्ताने कंपनीने हा टॅबलेट पीसी उपलब्ध करून दिला आहे. आयकॉन सीरिजमधील सर्वांत अत्याधुनिक टॅबलेटमध्ये थ्रीजी "जीएसएम'साठीची सेवा ही व्हाईस सुविधेसाठी वापरता येईल. मोबाईल टीव्ही ऍप्लिकेशनसह, थ्रीजी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. 

हायटेक तरुणाई, बिझनेस युजर्स, मल्टिटास्किंग होममेकर्स आणि विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवूनच हा टॅबलेट "बीएसएनएल'ने उपलब्ध केला आहे, असे कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. उपाध्याय यांनी सांगितले. मूल्यवर्धित सेवांसाठी "बीएसएनएल'शी विशटेलने केलेला करार हा ग्राहकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. तर ऍण्ड्रॉईड बिझनेस युजर्सना सर्वच सुविधा उपलब्ध असतील, असा टॅबलेट आम्ही लॉंच केला आहे, असा विश्‍वास "विशटेल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शाह यांनी सांगितले. सध्या 10 हजार 500 रुपयांना हा टॅबलेट उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टॅबलेटची वैशिष्ट्ये 7 इंच मल्टिटच कॅपॅसिटिव्ह स्क्रीन 
ऍण्ड्रॉईड 4.0 आईस्क्रीम सॅंडविच ओएस 
4 जीबी इंटर्नल मेमरी 
बॅटरी 4000 एमएएच 
2.0 मेगापिक्‍सेल कॅमेरा 
थ्रीजी सिम सपोर्ट 
एचडी रेडी  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS