बेस्टच्या ताफ्यात लवकरच २७० वातानुकूलित बसेस दाखल होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

बेस्टच्या ताफ्यात लवकरच २७० वातानुकूलित बसेस दाखल होणार


बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच २७० वातानुकूलित बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास कुल कुल होणार आहे.
२७० वातानुकूलित बसेस घेण्यासाठी १५ दिवसांपूर्वीच बेस्टने वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. या जाहिरातींनंतर एका कंपनीने १०० बसेस देण्याचा प्रस्ताव बेस्टकडे सादर केला आहे. मात्र संबंधित कंपनीला किमान २५० बसेस देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे सुचविले आहे. मात्र कोणत्याही एका कंपनीवर आम्ही अवलंबून राहणार नसून जी कंपनी २५० किंवा २७० वातानुकूलित बसेस देण्याचा प्रस्ताव सादर करील त्या कंपनीचा प्रस्ताव स्वीकारला जाणार असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले. बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनीही २७० वातानुकूलित बसेस खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले.सध्या बेस्टचे ४० ते ४५ वातानुकूलित बसमार्ग आहेत. २७० बसेस खरेदी केल्यानंतर किमान २५ जादा वातानुकूलित बसमार्ग तयार होणार आहेत. वाहतूक विभागाबरोबर चर्चा केल्यानंतरच हे बसमार्ग वाढविण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS