महात्मा फुले चित्रपटाला दिलेले 10 कोटीं खर्चच केले नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2012

महात्मा फुले चित्रपटाला दिलेले 10 कोटीं खर्चच केले नाही


मुंबई : सावित्रीबाईंच्या दृष्टिकोनातून उलगडलेल्या आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या एका चित्रपटासाठी केंद्र, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने 10 कोटींचा निधी जाहीर केला आहे. त्यापैकी 50 लाख रुपये खर्च झाले आहेत, मात्र 12 वर्षानंतरही या सिनेमाला मुहूर्तच गवसला नसल्याचे उघडकीस आले आहे. जब्बार पटेल यांनी 2000 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट तयार केला होता. या सिनेमास राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्याचवेळी सरकारने जोतिराव फुले यांच्या जीवनावर चित्रपटनिर्मितीची घोषणा केली होती. बुधवारी जोतिराव फुले यांची 175 वी पुण्यतिथी आहे, मात्र तब्बल 12 वर्षानंतरही या सिनेमाच्या प्राथमिक कामालाही सुरुवात झालेली नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS