मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथे शहरी दहशतवादविरोधी प्रशिक्षण केंद्र (यूसीटीटीसी) स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या केंद्रामध्ये पोलिसांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी कमांडो प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमध्ये ९८.६ एकर जागेवर हे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आणि राज्याच्या अन्य मोठय़ा शहरांमध्ये दहशतवादविरोधी घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. पोलीस दलाला मजबूत करणे तसेच आधुनिक बनवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रामध्ये फोर्स वन आणि शीघ्र कृती दलाच्या कमांडोंना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्राचा प्रमुख अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी असेल आणि तो विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधीन काम करेल. या केंद्रामध्ये विविध नियुक्त्या आणि कार्यप्रणालीशी संबंधित निर्णय पोलीस महानिरीक्षक घेतील. ज्या पोलीस अधिकार्यांना व कर्मचार्यांना अत्याधुनिक हत्यारे हाताळण्याचा तसेच स्फोटके वापरण्याचा अनुभव आहे, अशा पोलिसांची नियुक्ती या केंद्रामध्ये केली जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, सैन्य, पॅरा कमांडो, राज्य पोलीस आणि राज्य रिझर्व्ह दलाच्या अधिकार्यांना या केंद्रामध्ये तैनात केले जाईल, असे सांगण्यात आले.
Post Top Ad
13 February 2014
Home
Unlabelled
दहशतवादविरोधी प्रशिक्षण केंद्राची लवकरच स्थापना
दहशतवादविरोधी प्रशिक्षण केंद्राची लवकरच स्थापना
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment