रांगेतील वेळ वाचविण्यासाठी परेची योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2014

रांगेतील वेळ वाचविण्यासाठी परेची योजना

मुंबई : लोकलचे तिकीट काढायचे म्हणजे एक दिव्यच. रांगेत बराच वेळ उभे राहावे लागते, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांचा हा वेळ वाचविण्यासाठीच पश्‍चिम रेल्वेने एक योजना आखली आहे. या योजनेनुसार परे मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली या दोन स्थानकांत फक्त ५ आणि १0 रुपयांचे तिकीट देण्यासाठी दोन स्वतंत्र तिकीट खिडक्यांची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. उपनगरीय रेल्वेवर 0 ते १0 किलोमीटरच्या प्रवासासाठी ५ रुपये, तर ११ ते ३0 किलोमीटरच्या प्रवासासाठी १0 रुपयांचे तिकीट काढावे लागते.

५ ते ३0 किलोमीटरच्या टप्प्यात प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे. पश्‍चिम रेल्वेने घेतलेल्या एका सर्व्हेक्षणात ५ अणि १0 रुपयांच्या तिकिटांची विक्री जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या १0 मार्चपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर अंधेरी आणि बोरिवली स्थानकांत ५ आणि १0 रुपयांचे तिकीट देण्यासाठी स्वतंत्र तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना या तिकीट खिडक्या सहज समजाव्यात यासाठी ५ रुपयांचे तिकीट देणार्‍या खिडकीवर लाल रंगाने, तर १0 रुपयांचे तिकीट देणार्‍या खिडकीवर पिवळय़ा रंगाने मार्क केलेले असणार आहे. ५ आणि १0 रुपयांचे तिकीट देण्यासाठी या दोन स्थानकांत दोन तिकीट खिडक्या दोन शिफ्टमध्ये सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामुळे तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS