किनारे साफ करण्याचे काम कचरावेचक मुलांना द्या! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2014

किनारे साफ करण्याचे काम कचरावेचक मुलांना द्या!

मुंबई : वर्सोवा, मढ-मार्वे, गोराई या समुद्र किनार्‍यांची सफाई करण्यासाठी नियुक्त केलेले कंत्राटदार किनार्‍यांची साफसफाई चांगली करीत नसल्याबद्दल स्थायी समितीच्या सदस्यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. कोट्यवधी रु पयांचे कंत्राट देऊनही किनारे साफ होत नसतील तर किनारे स्वच्छ ठेवण्याचे काम कचरा वेचणार्‍या मुलांना द्या, निदान ते तरी किनारे नक्कीच स्वच्छ ठेवतील, असा टोला सदस्यांनी लगावला. 

किनार्‍यांची साफसफाई करण्यासाठी कंत्राटदार यंत्र वापरणार नसून मनुष्यबळ वापरणार असल्याबद्दलही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. हे तीन समुद्र किनारे साफ करण्याच्या नऊ कोटी ४८ लाख रुपयांचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीसमोर चर्चेसाठी आला, त्या वेळी सदस्यांनी कंत्राटदार किनारे साफ करण्याचे काम चांगले करत नाहीत, अशी टीका सर्व सदस्यांनी केली. सभागृह नेते यशोधर फणसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, भाजपाचे गटनेते दिलीप पटेल, रमेश कोरगावकर, शीतल म्हात्रे यांनी यावर मते मांडताना कचरा वेचणार्‍या मुलांना किनार्‍यांची सफाई करण्याचे काम द्या, अशी उपरोधिक सूचना केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS