KEM नामांतरावर खडाजंगी; किंग एडवर्ड कसाबसारखा, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा घणाघात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2026

KEM नामांतरावर खडाजंगी; किंग एडवर्ड कसाबसारखा, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा घणाघात


मुंबई - किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावर आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी किंग एडवर्डच्या नावाचे समर्थन करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडत, “किंग एडवर्ड हा भारताच्या गुलामगिरीचे प्रतीक असून कसाबसारखा माणूस होता. त्याच्या नावाचे समर्थन करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो,” असे वक्तव्य केले.

लोढा म्हणाले की, ब्रिटिश राजवट ही भारताच्या शोषणाची आणि लुटीची काळी पर्वणी होती. किंग एडवर्ड हा देशासाठी गौरवाचा विषय नसून गुलामगिरीच्या काळाचे प्रतीक आहे. भारताची संपत्ती लुटून इंग्लंडला नेण्यात आली आणि लाखो भारतीयांच्या मृत्यूसाठी ब्रिटिश सत्ताधारी जबाबदार होते, असेही त्यांनी नमूद केले.

KEM रुग्णालयाच्या नामांतराबाबत सरकारकडे तीन पर्यायी नावे देण्यात आली असून अंतिम निर्णय सरकार घेणार असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. मात्र, कोणतेही नाव निवडले तरी रुग्णालयाचे संक्षिप्त रूप ‘KEM’ हेच कायम राहील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प टॉवरच्या नावावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नालाही लोढा यांनी उत्तर दिले. “ट्रम्प टॉवर हे नाव केवळ व्यावसायिक भागीदारीमुळे देण्यात आले आहे. त्याचा कोणत्याही प्रकारच्या गौरवाशी संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

याच चर्चेदरम्यान विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी लोढा यांच्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर प्रत्युत्तर देताना लोढा म्हणाले, “माझा व्यवसाय संपूर्ण जगाला माहिती आहे आणि माझ्या उत्पन्नाचा स्रोतही सर्वश्रुत आहे. मात्र तुमचा व्यवसाय काय आहे, हे आम्हाला माहिती नाही. तरीही तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या गाडीतून फिरता,” असा पलटवार त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS