मुंबईत पावसाची दमदार हजेरी; मालवणीत ३२ मिमी पाऊस, रेल्वे-बेस्ट सेवा सुरळीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2026

मुंबईत पावसाची दमदार हजेरी; मालवणीत ३२ मिमी पाऊस, रेल्वे-बेस्ट सेवा सुरळीत


मुंबई - मुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हवामान अंदाजानुसार दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळी ८ ते ९ या एका तासात पश्चिम उपनगरातील मालवणी अग्निशमन केंद्र परिसरात सर्वाधिक ३२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ मालाडमधील एमएचबी महापालिका शाळा परिसरात २७ मिमी, तर बांद्रा अग्निशमन केंद्र परिसरात २३ मिमी पाऊस झाला.

शहर भागात एफ/दक्षिण विभागात २९ मिमी, जी/दक्षिण विभागात २५ मिमी, वरळी अग्निशमन केंद्रात २३ मिमी, तर मलबार हिल आणि सीआयडीएम परिसरात २२ मिमी पावसाची नोंद झाली. दादर अग्निशमन केंद्र आणि फ्रॉसबेरी जलाशय परिसरात २० मिमी पाऊस पडला.

गेल्या २४ तासांत सकाळी ८ वाजेपर्यंत शहर विभागात सरासरी १३.३० मिमी, पश्चिम उपनगरात ०.६२ मिमी आणि पूर्व उपनगरात ०.३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सर्व भुयारी मार्ग (सबवे) वाहतुकीसाठी खुले असून रेल्वे आणि बेस्ट बससेवाही सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS