मुंबई लोकलमधील हत्येचा उलगडा; आरोपीला २४ तासांत अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2026

मुंबई लोकलमधील हत्येचा उलगडा; आरोपीला २४ तासांत अटक


मुंबई, २४ जून : मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येच्या थरारक प्रकरणाचा उलगडा करत लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा फास्ट लोकलमध्ये घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास नालासोपारा फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात ही घटना घडली होती. पावसाचे पाणी डब्यात येत असल्याने दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हत्येचा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी २४ जून रोजी बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी पश्चिम परिमंडळातील रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेची सात विशेष पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान बोरीवली, अंधेरी, मीरा रोड, नालासोपारा रेल्वे स्थानके आणि परिसरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोशन (वय ३०), रा. मीरा रोड पूर्व, ठाणे याला नवी मुंबईतील पनवेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी सुरू केली असून हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम परिमंडळाच्या पोलिस उपआयुक्त सुनीता ठाकरे-साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासात बोरीवली रेल्वे पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि विविध तपास पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages