Red Alertमुळे Thane महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2026

Red Alertमुळे Thane महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी


ठाणे | जेपीएन न्यूज डेस्क, दि. ३ जुलै :
भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शनिवार, ४ जुलै रोजी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता पालक आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल आणि संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages