
मुंबई JPN NEWS - गोरेगाव पश्चिमेतील वासरी हिल परिसरात जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता फिर्यादी गौतम अनिल सिंग हे घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी जात होते. यावेळी वासरी हिल सिग्नलजवळ साईवनाथ मंदिर परिसरात त्यांचे चुलते आणि दोन चुलत भावांसोबत त्यांचा वाद झाला.
जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून आरोपींनी गौतम यांच्या वडिलांवर पाणी आणि सिगारेट फेकल्याचा आरोप आहे. याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपींनी गौतम, त्यांच्या वडिलांना आणि भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी एका आरोपीने गौतम यांचा गळा दाबल्याचा, तर दुसऱ्या आरोपीने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गौतम यांनी दिलेल्या तक्रारीवरून २६ सप्टेंबर रोजी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५२०/२०२६ दाखल करण्यात आला.
या प्रकरणी BNS 2023 मधील कलम 109(1), 115(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास मालाड पोलीस करीत आहेत.


No comments:
Post a Comment