२९ सप्टेंबरला एम पूर्व आणि पश्चिम विभागात २४ तास पाणीपुरवठा विस्कळीत, सात दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2026

२९ सप्टेंबरला एम पूर्व आणि पश्चिम विभागात २४ तास पाणीपुरवठा विस्कळीत, सात दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा


मुंबई JPN NEWS - एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशयादरम्यानचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

या कामामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील विविध परिसरांमध्ये या २४ तासांच्या कालावधीत पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही पुढील सात दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.

एम पूर्व विभागातील लल्लूभाई संकुल, कमला रमणनगर, रमण मामा नगर, शिवाजीनगर, लोटस वसाहत, गौतमनगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशीनाका, मानखुर्द, बेंगणवाडी, भारत नगर, म्हाडा इमारती, चिता कॅम्प, देवनार गाव व वसाहत, नवीन भारत नगर, हशू आडवाणी नगर, नटवर पारेख संकुल, सह्याद्री नगर, वाढवली गाव, बीएआरसी वसाहत, रफिक नगर, मंडाळागाव, नवीन मंडाळा, पद्मानगर, विष्णूनगर, आर.एन.ए. पार्क, कुकरेजा इमारती, महाराष्ट्र नगर आणि इंडियन ऑइल नगर या परिसरांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. तसेच बी.डी. पाटील मार्गावरील रिफायनरी विभागातही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

एम पश्चिम विभागातील मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, सुमन नगर, चिखलवाडी, आंबेडकर नगर, वामनवाडी, आनंद नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत, डब्ल्यू.टी. पाटील मार्ग, मुक्ती नगर, डायमंड उद्यान, सेंट्रल अव्हेन्यू मार्ग, एन.बी. पाटील मार्ग, घाटला गाव, एन.जी. आचार्य मार्ग, सुभाष नगर, चंद्रोदय सोसायटी, चरई गाव आणि बोरला सोसायटी परिसरातही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

याशिवाय चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, भक्ती भवन, समर्थ नगर, बसंत पार्क, गांधी बाजार, जनता मार्केट, इंदिरा नगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब, रामटेकडी, चेंबूर वसाहत, कोकण नगर, गणेश नगर, विजय नगर, अशोक नगर, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, आर.सी. मार्ग, माहूल गाव, आंबापाडा गाव, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, वाशी नाका, जिजामाता नगर, जयहिंद नगर, बीपीसीएल, माझगाव डॉक, टाटा पॉवर, भक्ति पार्क, टिळक नगर, ठक्करबाप्पा वसाहत, पेस्तम सागर, सहकार नगर, श्रमजीवी नगर, शेल वसाहत, पी.एल. लोखंडे मार्ग, रमाबाई वसाहत, अमीर बाग, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, मुकुंद नगर, नागेवाडी आणि छेडा नगर आदी परिसरांनाही याचा फटका बसणार आहे.

महापालिका प्रशासनाने संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले आहे. जलबोगदा कार्यान्वित झाल्यानंतर एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS