
मुंबई | JPN NEWS -
भारत निवडणूक आयोगाने दिल्लीतील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असताना, मुंबईसह महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेच्या वेळापत्रकात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यातील संथगतीने सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारत निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, दिल्लीतील BLO कडून घरभेटी व पडताळणीची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, दावे व हरकती स्वीकारल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील १६ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईतील SIR प्रक्रिया अद्याप संथ आहे. मुंबई उपनगरात केवळ ३९.५२ टक्के मतदारांपर्यंत फॉर्म पोहोचले असून, फक्त ७.०२ टक्के फॉर्मचे डिजिटायझेशन झाले आहे. तर मुंबई शहरात ४५.९० टक्के फॉर्मचे वितरण आणि १३.२९ टक्के डिजिटायझेशन, तसेच ठाण्यात ४३.४९ टक्के फॉर्म वितरण आणि केवळ ६.७३ टक्के डिजिटायझेशन झाले आहे.
विशेष म्हणजे, मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे लाखो मतदार तात्पुरत्या भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्यास आहेत. अशा मतदारांच्या SIR प्रक्रियेबाबत अद्याप स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने संभ्रम कायम आहे. पुनर्विकासग्रस्त इमारती, तात्पुरते स्थलांतरित मतदार आणि त्यांच्या मतदार नोंदणीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
दिल्लीला मुदतवाढ मिळाल्याने महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील संथ प्रगती लक्षात घेऊन SIR प्रक्रियेला मुदतवाढ दिली जाईल का, याकडे आता लाखो मतदारांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
या बातम्याही वाचा -
पुनर्विकास, SIR आणि मुंबईकरांचे हाल... विकासाच्या बदल्यात मतदानाचा हक्कही गमवायचा का?
मुंबई शहर व उपनगरात SIR प्रक्रिया संथगतीने; फॉर्म वितरण आणि डिजिटायझेशनमध्ये राज्यात तळाला
https://www.jpnnews.in/2026/07/Mumbai-City--Suburbs-Lag-Behind-in-SIR-Process.html
पुनर्विकास प्रकल्पांमुळे मुंबईतील लाखो मतदार SIR प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
https://www.jpnnews.in/2026/07/Lakhs-of-Mumbai-Voters-Feared-to-Be-Left-Out-of-SIR-Process-Due-to-Redevelopment-Projects-marathi-news.html
Lakhs of Mumbai Voters Feared to Be Left Out of SIR Process Due to Redevelopment Projects; Clarity Sought from Election Commission
https://www.jpnnews.in/2026/07/Lakhs-of-Mumbai-Voters-Feared-to-Be-Left-Out-of-SIR-Process-Due-to-Redevelopment-Projects-english-news.html


No comments:
Post a Comment